एका मराठी महिलेचं कुंकु ज्याने पुसलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे- अनिल परब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ”एका मराठी महिलेचं कुंकु ज्याने पुसलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे,” असा गंभीर आरोप परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अर्णव गोस्वामीच्या अटकेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेषकरून भाजप या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहे.

दरम्यान, ”अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फाईल बंद केली होती. नाईक यांच्या सुसाईड नोटद्वारे तपास झाला नाही. अर्णव गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे गळा काढत आहे. गोस्वामीला भाजपचे नेते वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे का?” असा सवाल अनिल परब यांनी केलाय. या खटल्याचा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याशी संबंध नाही, असा दावाही परब यांनी केला आहे.

अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी गोस्वामी यांच्या अटकेचं स्वागत केलं आहे. तसंच तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईबाबत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. अन्वय यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेत तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्वण गोस्वामी यांचं नाव आहे, तरीही कारवाई का केली गेली नाही? असा सवाल नाईक यांच्या मुलीने केलाय.

सातत्याने पाठपुरावा करुनही योग्य चौकशी करण्यात आली नाही. उलट आमच्यावरच सूडबुद्धीनं खटला दाखल केल्याचा आरोप लावण्याचा प्रयत्न झाला. पण आता मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया नाईक कुटुंबियांनी दिली आहे. ( Anvay naik family allegations on Arnav Goswami and thanks to Mumbai Police )

अर्णवने पैसे बुडावले नसते तर पती जिवंत असते
अर्णव गोस्वामी यांनी ६ कोटी ४० लाखापैकी आमचे ८३ लाख रुपये अद्याप दिलेले नाहीत. माझ्या वडिलांच्या आणि आजीच्या आत्महत्येला अर्णव गोस्वामीच जबाबदार आहेत, असा आरोप आज्ञा नाईक यांनी केला आहे. ‘अर्णव गोस्वामी यांनी पैसे बुडवल्याने माझे पती नवा प्रकल्प हाती घेऊ शकले नाहीत आणि त्यांनी आत्महत्या केली. आम्ही तक्रार केल्यानंतर धमक्या देण्यात आल्या. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केला आहे. रायगडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून आम्हाला सातत्यानं तपास सुरु असल्याचं सांगितलं गेलं. पण त्यात कुठलीही प्रगती झाली नाही, अशी खंतही नाईक कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.

काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.

अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले असावे असा अंदाज आहे. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी आता ही हायप्रोफाईल केस झाल्यामुळे त्यांनी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष तपास पथक
हाय प्रोफाईल केसमुळे रायगड पोलिसांनी तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथकाने अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली. तपासणीदरम्यान तपासाची पुढील दिशा निश्चित होण्यास चांगलीच मदत मिळाली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment