ओगलेवाडी येथे हद्दपारीचे उल्लघंन करणाऱ्यास अटक

कराड | पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाणे अंतर्गत ओगलेवाडीदुरक्षेत्र हद्दीतील रेकॉर्डवरील 11 गुन्हेगारांना 6 नोव्हेंबर रोजी 6 महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले होते. तरीही हद्दपारीचे उल्लघंन करणाऱ्या सागर सुभाष सुर्यवंशी (वय- 25, रा. हजारमाची, ता. कराड ) यास ओगलेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यातून हद्दपार असणाऱ्या सागर सूर्यवंशी हा काल दि 27/11/21 रोजी सायंकाळी 05.00 वा ओगलेवाडी येथे आले असल्याचे माहिती एपीआय विजय गोडसे यांना मिळाली. त्यावेळी बीट मार्शल याच्या मदतीनें सागर यास पकडण्यात यश आले आहे. सदरचा हद्दपारी विरोध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपाधीक्षक डाॅ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार सचिन सूर्यवंशी, महिला पोलीस नाईक डुबल, पोलीस कॉन्स्टेबल कपिल आगलावे यांनी केली.