अभिनेता रणदीप हुडाच्या अटकेची मागणी जोरावर; मायावतींवर अश्लील जोक करणे पडले भारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी विविध वादग्रस्त शब्द आणि विधानांमुळे वाद ओढवताना दिसत आहेत. असे वाटू लागले आहे जणू हा नवा ट्रेंडच झालाय. आता नुकतेच एक ताजे प्रकरण म्हणजे, बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाचे डर्टी जोक. आता यात मुख्य सांगायचे तर या जोक्समुळे रणदीपच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर होत आहे. माफी माग, याला अटक करा अश्या आशयाच्या कमेंट्स करीत लोक रणदीपच्या चांगलेच मागे लागले आहेत. त्याच्या एका जुन्या व्हिडीओत तो उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल अश्लिल विनोद करताना दिसतोय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच वायरल झाल्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला.

रणदीपचा हा व्हिडीओ एका इव्हेंटच्या आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच, मायावतींचे समर्थक चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ट्विटरवर रणदीपला असे काही फैलावर घेतले आहे कि बस्स.. इतकेच नव्हे तर यासोबत त्याच्या अटकेची मागणीही लावून धरली आहे.

रणदीप हुडाला अटक करा, आधी माफी माग, रणदीपने माफी मागितलीच पाहिजे. एका महिला नेत्याबद्दल इतकी घाणेरडी विचारधारणा?अश्या आशयाच्या समीक्षा देत या लोकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर रणदीपला अर्वाच्य भाषेत बोलत माफी माग असेही म्हटले आहे.

 

मात्र अद्याप तरी रणदीपने याबद्दल कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही आहे. यापूर्वी कॉमेडियन अबिश मैथ्यू यानेही मायावतींवर अशीच वादग्रस्त कमेंट केली होती. त्यावेळीसुद्धा लोकांच्या संतापाचा असाच उद्रेक झाला होता. त्यानंतर त्यानेदेखील माफी मागितली होती. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे संपूर्ण देशभरात अनेको समर्थक आहेत.

 

https://twitter.com/DineshKaushik_/status/1398100890758746117

 

ते मायावतींना ‘आयर्न लेडी’ मानतात. अशात रणदीपला त्याचा हा जोक महागात पडू शकतो, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेच तर, अलीकडेच तो सलमान खान अभिनित ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातील एका मुख्य भूमिकेत दिसतो आहे. या चित्रपटातील रणदीपच्या अभिनयाचे कौतुकही होत आहे.

Leave a Comment