चपलेत आयफोन अन् कानात हेडफोन्स, पोलिस भरतीचा पेपर फोडणाऱ्याला अटक 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – काल म्हणजेच शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी कारागृह पोलीस शिपाई पदाची परीक्षा झाली. त्या लेखी परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी एका उमेदवाराला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. विकास परमसिंग बारवाल असे प्रश्न पत्रिका लीक करणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. तो जालना येथील अंबड तालुक्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आयफोन आणि अत्यंत छोटे इअरफोन्स जप्त केले आहेत.

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या लालटाकी रोड परिसरातील केंद्रावर हा प्रकार घडला. परीक्षा सुरू झाल्यानंतर एका कक्षात सुपरवायझरला विकासकडे मोबाइल असल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या कानात छोट्या आकाराचे इअरफोन्स असल्याचे आढळले. विकासने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवला होता. तोफखाना पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

याशिवाय, औरंगाबादमधील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी शाळेच्या केंद्रात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. सोमनाथ विठ्ठल मोरे नावाच्या तरुणाने शर्टच्या आत एक टीशर्ट घातला होता. त्याला आतून पाकीट बनवून त्यात मोबाइल, मास्टरकार्ड म्हणजेच ब्लूटूथ कनेक्टर डिव्हाइस बसवलेले होते. तर कानात ज्वारीच्या दाण्याएवढे इअरफोन लपवलेले होते. या तरुणालाही पोलिसांनी अटक केले आहे.