मुंबई | कोरोनामुळे देशात सध्या लाॅकडाउन आहे. कोरोनाची बाधा कैद्यांना होऊ नये म्हणुन काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे. पॅरोलवर सुटलेला अंडरवर्ल्ड डॉन अर्थात डॅडी अरुण गवळीही पॅरोलवर सुटला आहे. सध्या डॅडी कॅरम खेळत कुटुंबीयांसोबत वेळ घालविताना दिसत आहे.
अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नी आजारी असल्याचं कारण दाखवून त्याने पॅरोलच्या रजेसाठी अर्ज केला होता. कोर्टाने २७ फेब्रुवारीला त्याचा पॅरोल मंजूर केला. त्यानंतर भायखळ्याच्या दगडी चाळीत आपल्या घरी आलेल्या गवळीने कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली. मात्र, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे प्रत्येकाला सक्तीनं घरी बसावं लागलं. डॅडीलाही सक्तीनं घरातच राहावं लागत असल्याने त्याने त्याच्या कुटुंबीयांसोबत कॅरम खेळत वेळ घालवायाला सुरुवात केली आहे. कॅरम खेळतानाही क्वीन कशी जिंकता येईल, याकडे डॅडीची नजर असल्याचंही एका व्हिडिओतून दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/B-gspWihqn1/?igshid=12kjxkahtx29c
अरुण गवळी, त्याची पत्नी आशा गवळी आणि कन्या नगरसेविका गीता गवळी आदी कॅरम खेळून सुट्टीच्या दिवसांची मजा लुटत आहेत. गवळी याचा जावई अक्षय वाघमारे यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दरम्यान, यापूर्वीही गवळी पॅरोलवर सुटून मुंबईत आला होता. त्याची वर्तवणूक चांगली राहिल्याने त्याला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत
मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे