अहमदनगर | सुजय विखे-पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेली अहमदनगर लोकसभेची लढत आता चुरशीची होणार हे स्पष्ट झालं आहे. आघाडीत बिघाडी करून सुजय विखे पाटलांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर राष्ट्रवादीनेही तात्काळ सूत्रे हलवत आमदार अरुण जगताप यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक चर्चा मंगळवारी केली होती. या जागेसाठी राष्ट्रवादीच्याच प्रशांत गडाख, अनुराधा नागवडे यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पहायला मिळणार आहे.
आपल्यावर पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा माझा प्रयत्न राहील असं मत अरुण जगताप यांनी व्यक्त केलं. दरम्यान धनंजय मुंडे यांना नगरच्या जागेसाठी अधिक लक्ष देण्याच्या सूचना केल्या गेल्या असून विखे पाटलांचे बालहट्ट पुरवणे आता शक्य नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे
नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?
राष्ट्रवादीला मोठा धक्का… ‘यांचा’ भाजप प्रवेश
काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात