दिल्ली वासियांनो, विनोद तावडेंना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला; अरविंद केजरीवालांनी उडविली विनोद तावडेंची खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रातील १३०० सरकारी शाळा बंद करणारे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री दिल्लीमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी आले आहेत, दिल्लीवासियांनो, तुम्ही खूप कष्ट घेऊन सरकारी शाळा सुंदर बनविल्या आहेत. विनोद तावडे यांना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला, ते आपले पाहुणे आहेत, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विनोद तावडेंची खिल्ली उडविली आहे. विनोद तावडे दिल्लीमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

 

अरविंद केजरीवालांनी त्यांच्या प्रचाराचा फोटो ट्विट करत त्यांची खिल्ली उडविली आहे. केजरीवाल यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. देशभरातील भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपकडून दिल्लीच्या विविध भागात सभा घेण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने या प्रचाराला सुरवात झाली होती.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान असून ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”