आर्यन खान प्रकरण : समीर वानखेडेवर डील करण्याचा आरोप करणाऱ्या पंचाविरोधात NCB कडून प्रतिज्ञापत्र दाखल, म्हणाले, “साक्षीदार पलटला”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आर्यन खान प्रकरणात NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांनी NDPS कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या खटल्यातील साक्षीदाराने माघार घेतली असून, विटनेस होस्टाइलची स्थिति कायम असल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले आहे. त्याचबरोबर प्रभाकर सेल यांचे निवेदन NCB मध्ये पंचाच्या स्वरूपात घेण्यात आले आहे. प्रभाकरने रविवारी केलेल्या आरोपांची माहितीही एजन्सीने न्यायालयाला दिली आहे.

या व्यतिरिक्त, NCB ने न्यायालयाला सांगितले आहे की,” या प्रकरणाच्या तपासात पंचांची माहिती लीक केली जात आहे. प्रतिज्ञापत्रातील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, NCB न्यायालयाकडून लवकरात लवकर सुनावणीची मागणी करण्यात आली आहे.” त्याचवेळी क्रूझ ड्रग्ज प्रकरणी पंच प्रभाकरही सोमवारी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना भेटायला पोहोचले.

माहितीनुसार, प्रभाकर यांनी शपथपत्र देऊन खुलासा केला आहे की, केपी गोसावी पैशांच्या व्यवहाराबद्दल बोलत होते, आणि त्यांनी ऐकले आहे की, 8 कोटी समीर वानखेडे यांना दिले जाणार आहेत.असे मानले जात आहे कि, प्रभाकर सेल मुंबईच्या सीपींना भेटून सुरक्षेची मागणी करू शकतात, .

Leave a Comment