Thursday, March 30, 2023

जोपर्यंत कोरोनावर वॅक्सिन येत नाही तोपर्यंत लाॅकडाउन राहणार – त्रिपुरा मुख्यमंत्री

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब म्हणाले आहेत की सध्या लॉकडाउन हटविण्याचा त्यांच्या सरकारचा कोणताही हेतू नाहीये. देव यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनावर वॅक्सिन येईल तेव्हाच राज्यातून संपूर्ण लॉकडाउन बंद होईल आणि संसर्ग होण्याचा कोणताही धोका राहणार नाही. त्रिपुरामध्ये आतापर्यंत कोरोना संसर्गाची दोनच प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि हे दोन्ही रुग्णही बरे झालेले आहेत.

विरोधकांचाही पाठिंबा मिळाला
बुधवारी रात्री राज्यातील सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, कोविड -१९ वर लस जाहीर होईपर्यंत राज्यातील लॉकडाऊन सुरूच राहणार आहे. थोडी सूट देण्यात येईल पण लॉकडाउन काढले जाणार नाही. मुख्यमंत्री बिप्लब देब पुढे म्हणाले की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्यातरी लॉकडाउन हाच एकमेव मार्ग आहे.या क्षणी बस, ट्रेन किंवा हवाई सेवा सुरू करणे अशक्य आहे.आयुष्याचाच एक भाग म्हणून लोकांनी लॉकडाउनला स्वीकारले पाहिजे.सर्वपक्षीय बैठकीत समाविष्ट असलेल्या १८ पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे समर्थन केल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

Tripura: Youth Arrested For Theft From ATM Found Dead In Police ...

लस कधी येईल?किती वेळ लागेल हे माहिती नाही
कोरोना विषाणूची लस बनविण्यासाठी जगभरात संशोधन चालू आहे परंतु आतापर्यंत त्यात यश मिळाले नाही. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, चीन यासह अनेक देशांत यांवर संशोधन चालू आहे.सर्व दावे असूनही, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की ही लस लवकरच येणे अपेक्षित नाही.मात्र,काही संस्थांनी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत ही लस उपलब्ध करणार असल्याचा दावा केला आहे.

कोरोनाच्या संक्रमणाची प्रकरणे सतत वाढतच आहेत
देश आणि जगात कोरोना विषाणूचा धोका वाढत आहे. देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या हि ३३ हजारांच्या पुढे गेली आहे.आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,गुरुवारी भारतात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३३,०५० झाली आहे आणि आतापर्यंत १०७४ लोकांचा मृत्यू झाला आहे.देशात सध्या २३,६५१ सक्रिय प्रकरणे आहेत म्हणजेच या लोकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.त्याच वेळी ८३२५ रुग्ण यांतून बरे झाले आहेत आणि आपल्या घरी गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.