Thursday, March 30, 2023

कुणी शाळा देत का शाळा ? औरंगाबादेत तब्बल 200 शाळा विक्रीला

- Advertisement -

औरंगाबाद : कोरोनामुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही शाळा विक्रिला काढल्या आहेत. संपूर्ण अर्थचक्र विस्कळीत झाल्याने सर्वच अडचणीत आले आहेत.यामध्ये काही शाळाही अडचणीत आल्या आहेत. त्यात आवक बंद आणि खर्च सुरू असल्याने जमाखर्चाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे शाळा हस्तांतरीत किंवा चक्क विक्रीला काढण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील तेराशे शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर 90% शाळा विक्रीला काढण्यात आल्या आहेत.

एकीकडे वर्षानुवर्षे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, गणवेश, सहली यांच्या माध्यमातून वसुली करून गब्बर झालेल्या शाळा आहेत. तर दुसरीकडे कोरोनामुळे मार्च 2020 पासून बंद असलेल्या विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायच्या कशा हा प्रश्न असलेले संस्थाचालक ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू होते मात्र त्या देखील काही दिवस चालवता आल्या. शाळा बंद झाल्या मात्र इतर खर्च बंद झाले नाहीत. मालकीची इमारत नसलेल्या शाळा यांना भाडे देणे आवश्यक आहे. फी मिळत नसल्याने भांडे कसे द्यावे ?, त्यात शिक्षकांचे पगार कसे द्यावे ? असे असंख्य प्रश्न संस्थाचालकांना पडलेत. त्यामुळे अनेकांना शाळा इतर लोकांना हस्तांतरण करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. तर काही जणांनी शाळा बंद करून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

विनाअनुदानित इंग्रजी शाळांवर आर्थिक संकट आले आहेत. अनेक संस्थाचालक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील संस्थाचालक हतबल झाले आहेत. जवळपास 20 ते 30 टक्के शाळेचे संस्थाचालक शाळा चालू शकत नसल्याची परिस्थिती सध्या उद्भवली आहे. त्यामुळे शाळांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी अल्पसंख्यांक संस्था महासंघाचे महासचिव नवी पटेल यांनी मागणी केली आहे.

मराठवाड्यातील तेराशे शाळा होणार बंद

औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याची इंग्रजी शाळेची परिस्थिती पाहिली तर अत्यंत दयनीय अशी आहे. त्यामुळे मराठवाड्यात जवळपास 3500 शाळा आहेत. तर जिल्ह्यात 795 शाळा आहेत. 90 टक्के शाळा विक्रीला काढण्यात आले आहेत. मराठवाड्यात तेराशे शाळा बंद करण्याची वेळ संस्थाचालकांवर आली आहे. त्यापैकी देखील 90 टक्के शाळा थेट विक्रीला असल्याचे मेयामुळे काही शाळा अडचणीत आल्या आहेत. मेस्टा संघटनेचे म्हणणे आहे. आर्थिक कोंडी मोठी असल्याने शाळा विक्रीला काढणार नाही तर काय करतील? असा प्रश्न मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी उपस्थित केला आहे.