सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडू लागल्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या दिवसेंन दिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचबरोबर बांधितांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याने सातारा व कराड येथे स्मशानभूमी कमी पडू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात 45 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक बांधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे.

कराड येथे गुरूवारी 4 मृत्यू झालेल्या बाधितांना काल एकाच वेळी अग्नि देण्यात आला. तर सातारा येथे एकाचवेळी 10 मृत्यू पावलेल्या बाधितांना एकाचवेळी अग्नि देण्यात आला. तेव्हा स्मशानभूमीत जागा शिल्लक नसल्याने इतर मृत्यू पावलेल्या बाधितांवर अंत्यसंस्कार उशिरा करण्यात आले. जिल्ह्यात वाढत असलेल्या रूग्ण संख्येमुळे चिंताजनक परिस्थिती बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कैलास स्मशानभूमीत 6 अग्नीकुंड वाढवणार ः राजेंद्र चोरगे

सातारा जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असुन कोरोनामुळे मृत्युच्या प्रमाणात ही मोठी वाढ झाली आहे. सातारा शहरातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या संगमाहुली येथील कैलास स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी अग्नीकुंड कमी पडत आहेत. सध्या कोविड साठी 10 अग्नीकुंड या ठिकाणी असुन आणखी 6 अग्नीकुंड सातारा नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत. आज सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बापट यांच्यासह पदाधिकारी आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी याठिकाणच्या अग्नीकुंडांची पाहणी केली. यावेळी अंत्यसंस्कारासाठी जागेची कोणतीही कमतरता भासणार नाही, असा विश्वास बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like