कोल्हापुरात पुन्हा मोठ्या पुराची शक्यता; राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरात पुन्हा मोठ्या पुराची शक्यता वर्तवली जात आहे. कारण तसे गंभीर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या राधानगरी धरणाच्या इमर्जन्सी गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून हे गेट जवळपास 18 फुटाने उघडले गेले आहे.

सकाळी पावणे नऊच्या सुमारास राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम सुरु होते. काम सुरु असतानाच अर्ध्यावरच गेट अडकले असल्याने पंचगंगा, भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू झाला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणावर इमर्जन्सी गेट बसवण्यात आले आहे. ज्यावेळी राधानगरी धरण 100 टक्के भरते त्यावेळी या दरवाजातून पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात केला जातो. देशातील कोणत्याही धरणावर बसवण्यात आले नसलेला राधानगरी धरणाच्या दरवाजात बुधवारी तांत्रिक बिघाड झाला.

राधानगरी धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम सुरू असताना तो अचानक उघडला गेला. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढला आहे. पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

धरणाचा दरवाजा उघडला गेल्याने कोल्हापूरच्यापंचगंगा नदीपात्रात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा युद्ध पातळीवर कामकरू लागली आहे. दरम्यान, प्रशासनाची अनेक पथके धरणाच्या ठिकाणी रवाना झाली असून नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी दाखल होताच तत्काळ युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली. अथक परिश्रमानंतर दुपारी तीन वाजता राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.

नेमके कसे आहे राधानगरी धरण –

राजर्षी शाहू महाराजांनी 1909 साली या धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली

हे धरण बांधण्यासाठी महाराजांनी दगडी बांधकामाचा प्रकार निवडला

या धरणाची उंची 38.41 मीटर आहे, तर लांबी 1037 मीटर आहे

धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 7 स्वयंचलीत दरवाजे बसवले आहेत

धरण पूर्ण क्षमतेने भरताच यापैकी एक-एक दरवाजा उघडला जातो