राज्य व केंद्र सरकार गंभीर नसल्याने OBC वर अन्याय – खासदार जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याने ओबीसींवर केवळ अन्याय झाला आहे. आम्ही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतोय, असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात खासदार जलील यांनी ट्विट केले आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयाने दिला आहे. त्यावर जलील यांनी मत व्यक्त केले आहे.

पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, जर 50 टक्के लोकसंख्येला आरक्षण दिले जाणार नसेल तर आता 10 टक्के लोक 100 जागा लढवतील. हे अवनतीचा मार्ग ठरेल. राजकीय सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मागास समाजासाठी महत्त्वाच्या असतात.

Leave a Comment