Home ताज्या बातम्या असदुद्दीन ओवेसी यांचा अफलातून ‘डान्स’ व्हिडिओ व्हायरल

असदुद्दीन ओवेसी यांचा अफलातून ‘डान्स’ व्हिडिओ व्हायरल

0
असदुद्दीन ओवेसी यांचा अफलातून ‘डान्स’ व्हिडिओ व्हायरल
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । ‘एमआयएम’चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट या ठिकाणी रॅलीनंतर एक नाच करुन उपस्थितांची मनं जिंकली. ‘मियाँ मियाँ भाई’ या गाण्यावर त्यांनी नाच केला. त्यांची ही डान्स स्टेप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतो आहे. पैठण गेट या ठिकाणी असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती.

या सभेनंतर हार घेऊन खाली उतरत असताना त्यांनी ही डान्स स्टेप केली आणि उपस्थितांची मनं जिंकली.सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. त्यामुळे आज संध्याकाळच्या आत विविध प्रचारसभाही रंगणार आहेत. अशात आता शऱद पवार आणि रोहित पवार यांचं पावसात भिजून भाषण करणं असेल, राहुल गांधी यांचं क्रिकेट खेळणं असेल हे सगळं गाजतंय. त्याता आता असदुद्दीन ओवेसी यांचीही भर पडली आहे. ओवेसी हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी कायम ओळखले जातात.

मात्र ओवेसी यांच्यातला दिलखुलास अंदाज १७ ऑक्टोबरच्या सभेनंतर पाहण्यास मिळाला. ओवेसी यांनी सभा संपल्यानंतर हार घेऊन खाली उतरत असताना मियाँ मियाँ भाई हे गाणं वाजत होतं. त्यावर पायऱ्या उतरताना एका पायरीवर त्यांनी डान्स स्टेप करुन दाखवली. त्यांचा हा नाच पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here