हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आधीच वातावरण तापलं असताना च एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारला धारेवर धरले. येत्या 11 डिसेंबर रोजी मुंबईत आरक्षणासाठी आणि वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली.
मुस्लिमांच्या आरक्षणाची गरज काय असे काही लोक बोलत आहेत. आम्ही शिक्षणात आरक्षण मागितलं. तुम्ही दिलं नाही. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तोंडं बंद का आहेत? असा सवाल त्यांनी केला. तसेच येत्या 11 डिसेंबर रोजी मुंबईत आरक्षणासाठी आणि वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहोत, असंही त्यांनी म्हंटल.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की बाबरी मस्जिद आम्ही पडली तेव्हा सेक्युलर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटली नाही? आपला परिवार वाचवण्यासाठी, घोटाळे लपवण्यासाठी, यांनी शिवसेनेसोबत एकत्र सत्ता स्थापन केली आणि सेक्युलरीजमला जमिनीत पुरून टाकलं अशी जोरदार टीका ओवेसी यांनी केली