हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना नव्या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) एक गुडन्यूज देण्यात आली आहे. इथून पुढे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल अशी घोषणा अर्थमांत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे आता दोन्ही सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिलांविषयी देखील अनेक घोषणा केली आहेत. त्या घोषणा पुढीलप्रमाणे आहेत.
महिलांसाठी केलेल्या घोषणा (Union Budget 2024)
- Union Budget 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस दिली जाईल अशी घोषणा केली आहे.
- तसेच, लखपती दीदी योजनेंतर्गत देशामध्ये एक कोटी लखपती दिली बनल्या आहेत. त्यामुळेच आता या योजनेचे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे 3 कोटी महीला लखपती दीदी बनणार आहेत.
- त्याचबरोबर आज निर्मला सीतारामन यांनी, केंद्र सरकार संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणल्याची माहिती दिली. त्याचबरोबर, तिहेरी तलाक प्रथा बंद करण्यात आली असल्याचे सांगितले. याबरोबर, पीएम आवास योजनेअंतर्गत 70 टक्के घरे ही महिलांना देण्यात येतील अशी घोषणा यावेळी (Union Budget 2024) त्यांनी केली.