हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील आशा वर्करसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यंदाच्या दिवाळीत आशा वर्कर्सला 2 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 7 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, गटप्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती बुधवारी आरोग्य भवन येथे झालेल्या आशा स्वयंसेविकांच्या बैठकीत आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत दिली आहे.
बुधवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात 80 हजारांवर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या सर्व आशा वर्कर्सला यापूर्वी 5 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. परंतु आता या मानधनात 7 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावर 3 हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे या घोषणेनंतर आशा सेविकांना 15 हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.
दरम्यान, राज्यात 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यात 3 हजार 664 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. या सर्व आशा वर्कर्सला 6 हजार 200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामुळे या मानधनामध्ये वाढ करणारी यावी अशी मागणी आशा वर्कर्सकडून करण्यात आली होती. त्यानंतर, बुधवारी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी 6 हजार 200 रुपये मानधनवाढ करण्यात आल्याची घोषणा केली आहे. तसेच, स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळीत 2 हजार रुपये बोनस म्हणून दिले जातील अशी देखील माहिती दिली आहे.