Ashadhi Ekadashi 2023 : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! सरकारकडून विमा योजनेची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2023) राज्यभरातून लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी पंढरपूरला निघाले आहेत. टाळ- मृदूंगाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. याच दरम्यान, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडून वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकार तर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना सरकारी पैशातून विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. सरकारची ही योजना मदत व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येईल. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेत ‘खालील गोष्टींचा समावेश : (Ashadhi Ekadashi 2023)

1) एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
2) दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील.
3) अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देण्यात येतील
4) वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार.