हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला विठुरायाची महापूजा करण्याचा मान मिळाला. यावेळी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे आणि सर्वाचं भलं होउदे असं साकडं एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला घातलं.
#LIVE | #पंढरपूर | आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सौ. लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा…https://t.co/HBBegutOsC
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2023
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी पूजा करण्याची मला संधी मिळाली मी माझे भाग्य समजतो. राज्यातील सर्व घटक सुखी समाधानी झाले पाहिजे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत हाच आपला उद्देश आहे. त्यामुळे बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं आपण विठुरायाला घातल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हणून भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांनी विठ्ठलाची पूजा केली. काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरीची पायी वारी करत आहेत. आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाल्यानंतर आम्ही धन्य झालो अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब काळे यांनी दिली.