हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मंदिर उघडण्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन पुकारले.तसेच, राज्यातील महाविकासआघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! या शब्दात टीका केली आहे.
यासंदर्भात आशिष शेलार यांनी ट्विट करून म्हटलं की जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसलेत. यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमीपुजन ई पद्धतीने करा, असे अनाहूत सल्ले दिले होते. “भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले.त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते. एवढेच नाहीतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!”
◆जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये "शेजारी-शेजारी" बसलेत
◆यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमी पुजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते..
◆"भारत तेरे तुकडे हो हजार" म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले…त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते..
एवढेच नाही..तर..1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 13, 2020
◆स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली
◆याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले
◆पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही..
हे कसले हिंदुत्वाचे पुजारी?
हे तर सत्तेचे लाचारी! 2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 13, 2020
दुसरीकडे राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारं पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी.” असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’