15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार; मिळणार मोठं पद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. आता अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा देखील चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे, येत्या 15 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, ही माहिती समोर आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी शहांचा महाराष्ट्र दौरा होईल. याचवेळी चव्हाण देखील भाजपमध्ये प्रवेश करतील.

15 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार

सोमवारी चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. तसेच आमदारकीचा राजीनामाही विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्याचे देखील सांगितले आहे. यामुळे आता लवकर अशोक चव्हाण भाजपची वाट धरतील, ही चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. यात समोर आलेल्या माहिती नुसार, 15 फेब्रुवारी रोजी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. या दौऱ्यादरम्यान अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये अशोक चव्हाण यांनी अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्याचवेळी राजीनामा देण्यासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याचबरोबर, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्ष प्रवेश व्हावा अशी इच्छा स्वतः अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच 15 फेब्रुवारीलाच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील याबाबत दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मिळणार मोठं पद

अशोक चव्हाण यांचे राजकीय वर्तुळात एक चांगले स्थान असल्यामुळे भाजप त्यांच्याकडे एक मोठे पद सोपवेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर, अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेतले जाईल, त्यामुळेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे, असे देखील म्हटले जात आहे.