हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे मोदी सरकारने निर्माण केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या कृत्रिम महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. आज सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्याच काम मोदी सरकार करतंय. लोकांमध्ये प्रचंड रोष आहे, अशी टीका यावेळी चव्हाण यांनी केली.
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, गैससह इतर वस्तूंच्या करवाढ व महागाईविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. आज नांदेड येथे काँग्रेसचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला जात आहे. यावेळी केलेल्या आंदोलनात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
LIVE: सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे मोदी सरकारने निर्माण केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या कृत्रिम महागाईविरोधात आंदोलनhttps://t.co/vouhfMYSik
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 15, 2021
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले कि, जनतेच्या मनात भाजप सरकारच्या विरोधात नाराजी आहे. म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेचा बुलंद आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याचे काम केले जात आहे. लोकांना खोटी आश्वासने द्यायचे आहे, त्यांना भडकवायचे आहे. पण भाजपने एक गोष्ट लक्षात घ्यावी कि, हि जी आग पेटलेली आहे. ती आग केंद्रातील सरकार भसम्सातकेल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलशी गैसच्या करात वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
आम्ही केंद्रसरकारने केलेल्या महागाईवाढीच्या विरोधात राज्यभर आंदोलन करीत आहोत. आजही मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल यांच्या राजभवनपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. अशा प्रकारे आम्ही सर्वसामान्य जनतेच्या न्याय, हक्क, मागण्यांच्यासाठी रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहोत, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.