हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पहायला मिळाला. निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत मात्र आजच पिंपरी चिंचवड मध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत.
दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार उभे आहेत. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत आहे. राहुल कलाटे यांच्या एंट्री मुळे चिंचवड पोटनिवडणुकीत मोठी रंगत आली आहे. उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वीच अश्विनी जगताप यांच्या विजयाच्या बॅनर्स मुळे चर्चाना उधाण आलं आहे.
… तीच काठी शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात; राजू शेट्टींचे Tweet चर्चेत
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/hB3zW4ivYR#hellomaharashtra @rajushetti
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 1, 2023
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागले आहेत. दरम्यान, यापूर्वी कसबा पेठ मध्येही काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले होते. पण आता हे विजयाचे बॅनर हटवण्यात आले आहेत. मात्र निकालाआधीच पुण्यात विजयाचे बॅनर्स झळकल्याने चर्चाना ऊत आला आहे.