जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये मौलाना विरूद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून सामूहिक नमाज पठणावर बंदी घालण्यात आलेली आहे.सामूहिक नमाजच्या पठणावरील सरकारी निषेधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील एका प्रसिद्ध धर्मगुरूंविरुध्द तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामाबाद पोलिसांनी शुक्रवारी मशिदीत नमाजसाठी लोकांना जमवण्याबद्दल लाल मस्जिदचे मौलाना अब्दुल अझीझ यांच्याविरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला.

Kashmir war fears grow as Pakistan cleric close to Osama bin Laden ...

एका पोलिस अधिकाऱ्याने डॉन वृत्तपत्राला सांगितले की पाकिस्तान दंड संहिता (पीपीसी) आणि शस्त्रे अध्यादेशाच्या संबंधित कलमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामाबाद प्रशासन अझीझच्या थेट आव्हानाला झुगारून देत आहेत कारण त्याने प्रत्येक नमाजवर लोकांना नुसते एकत्रच केले नाही तर सामूहिक नमाज पठणाचे नेतृत्व करणार असल्याचा दावा ऑनलाईन पोस्टमध्ये केला आहे. यानंतर तिसऱ्यांदा त्याच्याविरुद्ध त्याच कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

‘डॉन’ वृत्तपत्राने पोलिसांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, गेल्या तीन आठवड्यांत त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मशिदींमध्ये लोकांच्या जमावावर पाकिस्तानने बंदी घातली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की मौलाना व त्याच्या साथीदारांना लोकांना लॉकडाऊन निर्बंधांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यास सांगितले गेले परंतु त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले.

Maulana Abdul Aziz Occupy Red Mosque Supporting Terrorist Attack ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment