Asia Cup साठी तारीख-ठिकाणाची घोषणा, ‘या’ दिवशी होणार हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामना

india vs pakistan match
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आशिया कप 2022 (Asia Cup) साठी तारीख आणि ठिकाणाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने आशिया कपही (Asia Cup) टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. आशिया कप (Asia Cup) 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. याअगोदर या कपचे (Asia Cup) आयोजन श्रीलंकेमध्ये करण्यात आले होते मात्र श्रीलंकेतली सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती बघता आशिया कप युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेकडून घेण्यात आला आहे.

या दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना
आशिया कपमध्ये (Asia Cup) भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना रविवारी खेळवला जाणार आहे. आशिया कप सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला आणि मग 4 सप्टेंबरला रविवार आहे, त्यामुळे या दोनपैकी एका दिवशी भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होऊ शकतो. आशियाई क्रिकेट काऊन्सिलसह ब्रॉडकास्टर्स या मॅचमधून जास्त टीआरपी मिळण्याची अपेक्षा करत आहे, त्यामुळे रविवारीच ही मॅच होण्याची दाट शक्यता आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ताणल्या गेलेल्या संबंधामुळे दोन्ही देशात फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच (Asia Cup) सामने होतात. याआधी मागच्या वर्षी युएईमध्येच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. वर्ल्ड कप इतिहासातला भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच पराभव होता. आशिया कपमध्ये (Asia Cup) भारतीय टीम ही सगळ्यात यशस्वी आहे. आशिया कपला क्वालिफायर राऊंडने सुरूवात होणार आहे. यामध्ये युएई, कुवैत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. क्वालिफायर राऊंडमधला विजेता मुख्य स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध खेळेल.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर