Asia Cup 2023 च्या तारखा जाहीर; यंदाच्या स्पर्धेत केलाय सर्वात मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेने याबाबत माहिती दिली असून त्यानुसार यंदाचा आशिया चषक 31 ऑगस्ट पासून सुरु होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेचे आयोजन हायब्रीड मॉडेलमध्ये केले जाईल. यातील ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि बाकीचे ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. त्यामुळे यजमानपद सांभाळणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दणका असून श्रीलंकेला मात्र यामुळे मोठा फायदा होणार आहे.

आशिया कप 2023 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या 6 संघाचा समावेश आहे. हे 6 संघ दोन वेगवेगळ्या गटात विभागले जातील. म्हणजे प्रत्येक गटात 3 संघ असतील आणि दोन्ही गटातून एक- एक संघ अंतिम सामन्यात धडक मारेल. भारताच्या ग्रुप मध्ये नेपाळ आणि पाकिस्तानचा समावेश आहे तर दुसऱ्या ग्रुप मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.

खरं तर आशिया चषक 2023 चे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु BCCI भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याच्या तयारीत नव्हती. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी यंदाचा आशिया कप हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्यात आलाय. त्यानुसार, 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि बाकीचे 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. भारतीय संघाचे सामने हे श्रीलंकेत होणार आहे. तसेच आशिया चषकाचा अंतिम सामनाही श्रीलंकेतच होणार आहे.