व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, ‘त्या’ मुलीवर बलात्कार झालाच नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील धावत्या लोकलमध्ये आज एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र सदर मुलीवर बलात्कार झाला नसून तिच्याशी शारीरिक लगट करण्यात आल्याची माहिती लोहगाव पोलीस स्टेशनने सांगितली आहे. याबाबत पोलिसांकडून प्रेसनोट सुद्धा जारी करण्यात आली. याच प्रेसनोटचा दाखल देत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मोठया ताई, तुम्ही मुलीवर लोकल रेल्वेत बलात्कार झाल्याचं ट्विट केलंय पण तसं काहीच घडलं नाही, त्यामुळे थोडी शहानिशा तरी करायची असं म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटल, अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती. तुम्ही मुलीवर लोकल रेल्वेत बलात्कार झाल्याचं ट्विट केलंय पण तसं काहीच घडलं नाही. नाहक मुलीची बदनामी करू नका..

त्या आरोपीनं मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल त्याला अटक केली. ही वस्तुस्थिती आपण मुंबईआयुक्त यांच्याकडूनही माहिती घेऊ शकला असता. पण ते न करता बलात्कार झाला म्हणत ट्वीट केलत. तुमच्या या वक्तव्यामुळे खोट्या बातम्यांचा आणि अफवांचा सुकाळ होण्यास हातभार लागणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अफवा पसरवू नका आणि माझी संपूर्ण जनतेला विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका ! अत्याचार करण्याचा प्रयत्न असेल किंवा अत्याचार हे दोन्ही गंभीर आहे. महिला सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाहीच. लोकल मध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देणं ही रेल्वे पोलिसांची जबाबदारी आहे, त्यापासून पळ काढता येणार नाही. या निमित्तानं रेल्वे हेल्पलाईन आणि लोकल मधील महिलांबाबतचे गुन्हे याचं ॲाडीट करणं गरजेचं आहे व ते येणाऱ्या दिवसात नक्कीच होईल असेही चित्रा वाघ यांनी म्हंटल.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या-

मुंबई लोकलमध्ये मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली होती. “संतापजनक! चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे,” असं मत सुप्रिया सुळेंनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं.