Pune News : चक्क PMPML बसच चोरट्यांनी पळवली; अजब प्रकाराने पुण्यात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे तेथे काय उणे अशी म्हणत आपल्याकडे प्रचलित आहे. पुण्यात कधी काहीही घडू शकत असा उपहासात्मकपणे बोललंही जाते. परंतु अशीच एक विश्वास न बसणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात चोरट्यांनी चक्क PMPML बसच पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने बस पळवून नेली. याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पालखी सोहळ्यामुळे बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्यानं पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता चालकाने सारसबाग परिसरात परिसरातील सणस मैदान परिसरात लावली होती. त्यावेळी बसला चावी तशीच होती. चावी पाहताच चोरट्याने मध्यरात्रीच बस पळवून नेली. यानंतर चोरट्याने पीएमपी बस मार्केट यार्ड आगाराच्या परिसरात ही बस लावून चोरटा पसार झाला मात्र यावेळी त्याने बसमधील बॅटरी चोरून नेली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या धक्कादायक घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी सिताप याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. आत्तापर्यंत आपण दुचाकी- चारचाकी गाड्या चोरल्याचे ऐकले होते, पण चक्क बसच चोरल्याचा या घटनेनं पुणे पुन्हा एकदा चर्चेत आलं.