हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाकडून आपल्या संस्थापकाच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी क्रूझ मिसाइल मानले जाणारे मिसाइल डागण्यात आले. दक्षिण कोरियाच्या सैन्य दलाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाकडून आपल्या लढाऊ विमानांमधून हवेतून जमिनीवर मारा करणारे क्रूझ मिसाइल्स डागण्यात आले. जॉइंट चीफ ऑफ स्टाफने (जेसीएस) सांगितले की,हे क्रूझ मिसाइल्स ४० मिनिटांपेक्षा जास्त कालावधीत सकाळी ७ च्या सुमारास पूर्वेकडील किनारपट्टीचे शहर मुंचॉनजवळ ईशान्य दिशेच्या पूर्वेकडील भागातून सोडण्यात आले.
जेसीएसने सांगितले की, मिसाइलच्या प्रक्षेपणाबरोबरच उत्तर कोरियाने पूर्वेकडील किनारी शहर वोनसनवर अनेक सुखोई-प्रकारातील लढाऊ विमाने उडविली आणि पूर्व समुद्राकडे अनेक ‘एंटी-ग्राउंड’ मिसाइल्स डागले. देशातील सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या मिसाइल्सची चाचणी घेण्यात आली आहे का हे अद्यापही समजू शकलेले नाही आहे. योन्हाप जेसीएसने जाहीर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सैन्य आणि मिसाइल प्रक्षेपण होण्याची शक्यता पाहता ते या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
उत्तर कोरियाचे राष्ट्रीय संस्थापक आणि देशाचे विद्यमान सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांचे आजोबा किम इल-सुंग यांच्या १०८ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ही मिसाइल्स डागण्यात आली. संस्थापक नेत्याचा वाढदिवस हा उत्तर कोरियामध्ये सर्वात मोठी राष्ट्रीय सुट्टी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.