हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या शुक्रवार हा दिवस कोरोना विषाणूचा हा साथीच्या आजार वाढत असताना पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण होत आहे. पाकिस्तानमध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उलेमाचा एक भाग,सरकारने घातलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन करत मोठ्या मशिदींमध्ये जाहीरपणे सामूहिक नमाज अदा करण्याचा आग्रह धरला आहे.
लॉकडाऊनमुळे पाकिस्तान सरकारने देशातील सर्व मशिदींमध्ये सामूहिक नमाज पढण्यास बंदी घातली आहे. कोणत्याही मशिदीत एकावेळी जास्तीत जास्त पाच लोक येऊ शकतात.परंतु,यापूर्वी काही ठिकाणी लोकांनी हा नियम मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या पोलिसांशी चकमकीही झाल्या.
आता, उलेमा आणि धार्मिक नेत्यांनी घोषणा केली आहे की ते कोरोना टाळण्यासाठी सुरक्षितता उपायांचा अवलंब करतील, परंतु मशिदीमध्ये लॉकडाऊन नियमांचे पालन करणार नाहीत आणि मोठ्या संख्येने प्रार्थना करतील.या घोषणेनंतर प्रथमच १७ एप्रिल रोजी जुम्मा पढण्यात येत आहे. सरकार लॉकडाउनचे उल्लंघन करू इच्छित नाही तर उलेमा आपल्या एकत्रित नमाज पढण्यावर असून राहिलेत यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झालाय.
पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे धार्मिक कार्यमंत्री पीर नूर उल कादरी यांनी प्रख्यात धार्मिक नेते मुफ्ती तकी उस्मानी आणि काही इतरांशी बोलणी केली आणि कोरोना प्रकरणातील सरकारी निर्देशांचे उल्लंघन न करता घरातच नमाज अदा करण्यास सांगितले.उस्मानी यांनी कादरी यांच्या भेटीबाबत पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की कादरी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की सरकार त्यांच्या सूचनांवर विचार करेल.
सुन्नी मुस्लिमांच्या सर्व मतांच्या उलेमानी असे म्हटले आहे की ते यापुढे मशिदी बंद ठेवू देणार नाहीत आणि सामूहिक नमाज वाचतील. तथापि, शिया समुदायाच्या यांनी हे स्पष्ट केले आहे की त्यांचा समुदाय सरकारच्या निर्देशांचे पालन करेल आणि त्यांच्या कोणत्याही मशिदीत पाचपेक्षा जास्त लोक असणार नाहीत.या समाजातील लोक त्यांच्या घरातच नमाज अदा करतील. सामूहिक नमाजांवर उलेमा अडून असल्याची टीका पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी केली असून सरकारने हे होऊ देऊ नये अशी मागणी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.