भाजपा आमदाराने कोरोनावर शोधला रामबाण उपाय; गोमूत्र, शेणाने करता येतो इलाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूवर उपचार शोधण्यासाठी जगभर युद्धपातळीवर संशोधन सुरु असताना आसाममधील एका भाजपच्या आमदाराने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी रामबाण इलाज शोधून काढला आहे. तो म्हणजे, गाईचे गोमूत्र आणि शेणानं कर्करोगच नाही तर कोरोनासारखे घातक रोग बरे होऊ शकतात असा दावा या आमदाराने केला आहे.

आसाममधील आमदार सुमन हरिप्रिया यांनी आसामच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशमध्ये गुरांची तस्करीच्या चर्चेत भाग म्हणाल्या की, “गाईच्या शेणाचा किती फायदा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे.” तसेच,गोमूत्राची फवारणी परिसर स्वच्छ करण्यासाठी केली जाते, त्यामुळं मला विश्वास आहे की कोरोना विषाणू गोमूत्र आणि शेणापासून देखील बरा होऊ शकतो.” दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत तब्बल 2,943 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment