Wednesday, March 29, 2023

सोलापूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. याचे पडसाद सोलापुरात हि पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळे – हम जवाब नहीं देंगे ,हम कागज नहीं दिखाएंगे ! – चा सामूहिक नारा सोमवारी सोलापुरात ऐकायला मिळाला. यावेळी कॉ आडम मास्तर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी करत जोरदार निदर्शने केली.

या वादग्रस्त कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप सरकारनं म्हटलं आहे. मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे.

- Advertisement -

हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, उत्तर प्रदेशमधील अलिगढ मुस्लीम विद्यापीठ यांच्यासह अनेक ठिकाणी विद्यार्थी आंदोलनं सुरू आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.