हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election) राज्यात बिगुल वाजले गेले आहे. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार येत्या 7 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरदरम्यान मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा अशा 5 राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती आजच्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा अशा 5 राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, 17 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशमध्ये, 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये, तसेच 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये, 7 नोव्हेंबर रोजी मिझोरममध्ये, 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये मतदान पार पडणार आहे. या 5 ही राज्यांचे मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. फक्त छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान केले जाईल, मात्र इतर राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल.
http://pic.twitter.com/jV7TJJ9W4A
दरम्यान, या 5 राज्यात 16 कोटींपेक्षा अधिक मतदार आहेत. या पाचही राज्यात 679 जागांसाठी मतदान केले जाईल. यावर्षी मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही महिलांची आहे. तर यावर्षी 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. या मतदानासाठी आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होममार्फत मतदान करता येईल. आता या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे लवकरच याठिकाणी आचारसंहिता देखील लागू करण्यात येईल.
मिझोरममधील मतदान आणि निकाल
मतदान तारीख – 7 नोव्हेंबर रोजी
निकाल – 3 नोव्हेंबर
छत्तीसगडमधील मतदान आणि निकाल
मतदान तारीख – 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर
निकाल – 3 नोव्हेंबर
मध्यप्रदेशमधील मतदान आणि निकाल
मतदान तारीख – 17 नोव्हेंबर
निकाल – 3 नोव्हेंबर
राजस्थानमधील मतदान आणि निकाल
मतदान तारीख – 23 नोव्हेंबर
निकाल – 3 नोव्हेंबर
तेलंगाणामधील मतदान आणि निकाल
मतदान तारीख – 30 नोव्हेंबर
निकाल – 3 नोव्हेंबर