पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या १० मार्चला जाहीर होतील. मागील महिनाभर या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती. आज उत्तरप्रदेश मध्ये सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मुख्य राजकीय पक्ष आपली ताकद दाखवून देत असताना निवडणूक निकालाच्या ३ दिवस आधी नेमकी लढत कुणामध्ये आणि कशी आहे हे जाणून घेऊया.
उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांना मुख्य आव्हान असलेल्या काँग्रेसमध्ये जोरदार लढाई आहे. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत पाहायला मिळते. एक तृतीयांशपेक्षा अधिक मत मिळवणारा पक्ष याठिकाणी वरचढ ठरतो.
उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष समाजवादी पार्टी यांच्यात जोरदार प्रचार सुरू असून येथे रंगतदार लढत अपेक्षित आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्ते, वीज, मंदिर निर्माण या कामाने लोकांची मनं जिंकली असली तरी प्रदेशातील बहुसंख्य लोक त्यांच्यावर नाराज आहेत. यादव व्यतिरिक्त ओबीसी आणि जाटव व्यतिरिक्त दलित मतांच्या जुळणीचं गणित अखिलेश यादव यांनी जुळवल्यामुळे यंदाची निवडणूक समाजवादी पक्षाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडेल असाही कयास बांधला जात आहे.
पंजाबमध्ये सर्वांच्या नजरा आम आदमी पक्षाकडे लागल्या आहेत, जो मोठी मुसंडी मारेल असा अंदाज आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या राज्यात विशेष मेहनत घेत काँग्रेसवर हल्ला चढवला. मात्र त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर द्यायचं काम चरणजीत सिंग चन्नी या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असून पंजाबमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकेल का हे पाहणं यामुळेच औत्सुक्याचं आहे.
मणिपूरमध्ये, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून JD(U) मध्ये झालेल्या पक्षांतराने तुलनेने कमी प्रसिद्ध पक्षाला स्पर्धेत आणले. आणि तिथेही हाय वोल्टेज लढाई पहायला मिळेल.
गोव्यात तृणमूल काँग्रेसने केलेल्या एंट्रीमुळे आणि ‘आप’च्या जोरदार प्रचारामुळे निवडणूक रंगतदार बनली. आहे. गोव्यात भाजप पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल, तर काँग्रेसही सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील राहील. मनोहर पर्रीकर यांच्या सुपुत्राने केलेली बंडखोरी भाजपला त्रासदायक ठरणार का हे यानिमित्ताने पाहणं रंजक ठरेल.
डेलीहंट पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे थेट कव्हरेज करत आहे. निवडणुका केवळ आकड्यांवर नसतात, असे आमचे मत आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निकाला पर्यंत पोहोचण्यासाठी डेटा, नमुने आणि विश्लेषणाचा अर्थ लावण्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही सर्व कानाकोपऱ्यातून विश्लेषण करू आणि डेटा आणि त्याचा अर्थ काय आहे याचा सखोल अभ्यास आपल्यापुढे सादर करू.
पाच राज्यांमधील निकालांचे लाईव्ह आणि फास्ट अपडेट तेही चांगल्या सारणीच्या स्वरूपात.
आकडे, मागील निकालांशी तुलना, राज्य आणि मतदारसंघनिहाय, जागा बदलांचे अपडेट, सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया, ट्विटरवरील ट्रेंड, लाइव्ह व्हिडिओ, व्हायरल मीम्स, ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडीओ अशा गोष्टी तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करू शकता. तर, विधानसभा निवडणुकीच्या सर्वात सखोल आणि रोमांचक कव्हरेजसाठी संपर्कात रहा.