सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
30 ते 35 वर्षे एकत्रितपणे राहून पोलीस दलात काम केल्यानंतर साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस फौजदार एस. ए. भोसले हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या इतर सहकारी मंडळींनी अनोख्या पद्धतीने सोहळा साजरा केला. ते कार्यक्रमास सहकुटूंब पोलीस ठाण्यात आले असता त्यांचे गुलाबाच्या फुलांनी वर्षाव करत स्वागत केले.
सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार एस. ए. भोसले यांचा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रम पोलीस दलाच्यावतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक संजय पतंगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. बधे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पोलिसांकडून फुलांच्या वर्षावाने सहकारी सहाय्यक फौजदाराचा सेवानिवृत्त सोहळा
शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोलीस झाले भावुक pic.twitter.com/9pctZVa6CO
— santosh gurav (@santosh29590931) April 1, 2023
सातारा जिल्ह्यात एसआरपी ग्रुप, पोलीस मुख्यालय सातारा आणि शाहूपुरी पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी सहाय्यक पोलीस फौजदार एस. ए. भोसले यांनी आपली प्रामाणिकपणे 36 वर्ष पोलीस दलात सेवा बजावली. ते पोलीस व्हॅनमधून पोलीस चौकीत दाखल होताच त्याचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी भोसले यांच्यासोबत काम कर्णाच्या इतर सहकारी भावुक झाले तर काहींना अश्रू अनावर झाले. हा सोहळा कायम माझ्या स्मरणात राहील अशी भावना यावेळी एस. ए. भोसले यांनी व्यक्त केली.