Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही

Asus ROG Phone 6 Pro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात मोबाईलचे वेड (Asus ROG Phone 6 Pro) अनेकांना आहे. सतत नवनवीन मोबाईल फोन घेणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातच आता Asus चा ROG Phone 6 Pro मोबाईल लॉन्च झाला असून लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. १८ GB RAM आणि 6000mAh च्या दमदार बॅटरीमुळे हा मोबाईल जोरदार चर्चेत आहे. आजच्या आपल्या मोबाइल रिव्हिव्ह मधून जाणून घेऊया या स्मार्टफोन मध्ये कोणकोणती खास फीचर्स आहेत ….

6.78  इंच डिस्प्ले-

Asus रोग फोन 6 प्रो ला (Asus ROG Phone 6 Pro) 6.78 इंच Full HD+ एमोलेड (AMOLED) डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट 165 हर्ट्ज आहे. Asusचा हा स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर सपोर्टसह येतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Asus ROG Phone 6 Pro

या Asus फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, NFC, ट्राय-मायक्रोफोन अॅरे, स्टीरिओ स्पीकर आणि 12 5G बँड उपलब्ध आहेत. डिव्हाइस Android 12 आधारित कस्टम स्किनसह येते. Asus ने फोनमध्ये दोन वर्षांसाठी सिस्टम अपडेट्स आणि दोन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्सचे आश्वासन दिले आहे.

Asus ROG Phone 6 Pro

कॅमेरा- (Asus ROG Phone 6 Pro)

मोबाईलच्या कॅमेरा (Asus ROG Phone 6 Pro) बाबत बोलायचं झालं तर या स्मार्टफोनला 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तसेच 13 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, 5 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 12-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

6000mAh ची दमदार बॅटरी-

Asus रोग फोन 6 प्रो ला 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये (Asus ROG Phone 6 Pro) चार्जिंगसाठी दोन USB Type-C पोर्ट आहेत.

18 GB रॅम-

या मोबाईलची खास गोष्ट म्हणजे याच स्टोरेज…. Asus Rog Phone 6 Pro मध्ये 18 GB रॅम आणि 512 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. त्यामुळे जर तुम्ही मोबाइलवर गेम खेळत असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी खास उपयोगी पडेल.

Asus ROG Phone 6 Pro

मोबाईल किंमत-

मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झालं तर Asus रोग फोन 6 प्रोची किंमत 89,999 रुपये आहे. हा हँडसेट एकाच पांढऱ्या रंगात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

हे पण वाचा :

Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत

OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Google Pixel 6a : भारतात लॉंच झाला गुगल Pixel 6a; किंमत आणि फीचर्स बद्दल जाणून घ्या

Oppo Reno 8 Pro : दमदार फीचर्ससह लॉंच झाला Oppoचा Reno8 Pro; पहा किंमत आणि सर्वकाही

iQOO 10 Pro : फक्त 12 मिनिटांत चार्जिंग फुल्ल; iQOO चा नवा स्मार्टफोन बाजारात छाप पाडणार