सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडे विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, दिवसेंन दिवस कोरोना बाधितांची हजारांच्या पटीने वाढ होवू लागली आहे. तर दुसरीकडे बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पहायला मिळत आहे. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू वर्षातील नवा उंच्चाक कोरोनाबाधितांचा आलेला आहे. जिल्ह्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 90 जण कोरोनाबाधित आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 75 हजार 300 आहे. तर जिल्ह्यात एकूण 64,265 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 928 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत.
कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. विकेंड लाॅडकडाऊन कडक सोमवारी दिवसभर लोकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केलेली होती. बुधवारी दुपारी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कडक लाॅकडाॅऊन लागण्याच्या भीतीने लोकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी झुबंड उडालेली पहायला मिळाली. या गर्दीपुढे सर्वच विभागातील प्रशासन हातबल होवून केवळ बघत होते. यांचा परिणाम म्हणजे कोरोना बाधितांची दिवसेंन दिवस संख्या वाढू लागलेली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा