Atal Setu | सरकारने नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा अटल सेतू केलेला आहे. याचा प्रवाशांना खूप जास्त फायदा झालेला आहे. या अटल सेतूच्या बांधकामामुळे जो प्रवास करायला नागरिकांना दीड तास लागायचा. तो प्रवास आता केवळ 20 मिनिटात ते पूर्ण करू शकत आहे. आता या मार्गावरून एसटी बस किंवा बेस्ट सुरू करावी. अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने येत होती. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने देखील याबाबत विचार केला आहे. आणि लवकरच प्रवाशांसाठी या मार्गावरून बस सेवा सुरू केली जाणार आहे. प्रवाशांना केवळ 20 मिनिटात मुंबई गाठता येणार आहे.
नवी मुंबईमधील असे अनेक लोक आहेत. जे लोक कामासाठी मुंबईमध्ये येत असतात. परंतु रेल्वे मार्गाने खूप जास्त गर्दी असते. आणि खर्चिक देखील असते. त्यामुळे या प्रवाशांनी अटल सेतूचा वापर करण्यासाठी तसेच या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. आणि आता त्यांची ही मागणी पूर्ण झालेली आहे. वाहतूक कोंडीमुळे त्यांना मुंबईत पोहोचायला खूप वेळ लागत होता. परंतु आता अटल सेतूवरून (Atal Setu) ते केवळ 20 मिनिटात मुंबईत पोहोचू शकतात. आणि इंधनाची देखील बचत होणार आहेत. तसेच नवी मुंबईतील प्रवाशांना मंत्रालय गाठणे देखील खूप सोपे होणार आहे. प्रवाशांनी केलेली ही मागणी पाहता गणेशोत्सवापासून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अटल सेतूद्वारे मुंबईतला पोहोचणे खूप सोपे होणार आहे.
या अटल सेतूवरून बस क्रमांक 116 आणि 117 या दोन बसेस चालवण्यात येणार आहे. बस क्रमांक 116 ही नेरूळ बस स्थानक पूर्व ते मंत्रालय उलवे मार्ग, मोठा उलवा गाव प्रभात, रामशेठ ठाकूर स्टेडियम, खारकोपर रेल्वे स्थानकामार्गे सेतूवरून मंत्रालयात जाणार आहे. ही बस सेवा सोमवार ते शनिवार सुरू राहणार आहे. तसेच या बसचे भाडे 230 रुपये एवढे असणार आहे. त्याचप्रमाणे 117 क्रमांकाची बस ही खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय मार्ग पनवेल, पळस्पे, गव्हाण टोल, नाका, खारघर येथून हायवे पनवेल बस स्थानक पळसपे फाटा या मार्गावरील मंत्रालयापर्यंत जाणार आहे. या बसचे भाडे 270 रुपये एवढे असणार आहे.
अटल सेतूचे (Atal Setu) लोकार्पण हे 12 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले. त्याचप्रमाणे 13 जानेवारी रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला होता. जानेवारी ते ऑगस्ट या सात महिन्याच्या कालावधीत या सेतूवरून 50 लाख 4 हजार 350 वाहनांनी प्रवास केलेला आहे. या सेतूवरून प्रवास करताना प्रवाशांच्या वेळ खूप वाचणार आहे.