हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सर्वचजण पैसे काढण्यासाठी ATM चा वापर करतात. बँकेत रांगेत उभं राहून पैसे काढण्यापेक्षा ATM मधून आरामात आणि कमी वेळेत आपण हवे तेवढे पैसे काढू शकतो. भारतात सुद्धा कानाकोपऱ्यात ATM मशीन उपलब्ध असून ग्राहकांची चांगली सोया झाली आहे. परंतु जर ATM मधून फाटक्या नोटा आल्या तर? अशावेळी काय करायचं असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. चुकून जरी फाटक्या नोटा आल्या तर काय करायचं? आपले पैसे कसे मिळवायचे?? पण चिंता करू नका.. अशावेळी काय करायचं ते आज आम्ही तुम्हाला सांगतो.
सर्वात आगोदर ज्या ATM Machine मधून तुम्हाला फाटलेल्या नोटा मिळाल्या आहेत त्या बँकेत जावा.
बँकेत गेल्यानंतर एक फॉर्म भरावा लागेल, या फॉर्म मध्ये तुम्ही कोणत्या ATM मधून पैसे काढले? किती रुपये काढले आणि त्यावेळी वेळ काय होती या सर्व गोष्टी सदर फॉर्म मध्ये तुम्हाला नमूद कराव्या लागतील.
या फॉर्ममध्ये ATM मधील तुमच्या पेमेंटची स्लिप जोडावी लागेल.
जर तुम्ही स्लिप नसेल काढली तर मोबाइलवर आलेल्या ट्रांजेक्शन डिटेलची माहिती देऊ शकता.
हा फॉर्म भरल्यानंतर बँक तुम्हाला नोटा बदलून देईल.
एप्रिल 2017मध्ये RBIने एका गाइडलाइनमध्ये म्हटलं आहे की, बँक फाटलेल्या व खराब झालेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. सर्व बँकांना फाटलेल्या नोटा बदलून देणे बंधनकारक आहे. मात्र आरबीआयच्या नियमांनुसार, पूर्णपणे जळालेल्या, तुकड्या तुकडे झालेल्या नोटा बदलता येत आहे. या पद्धतीच्या नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा करण्यात येतात. तसंच, नियमांनुसार, जर कोणत्या बँकेने तुम्हाला नोटा बदलण्यास नकार दिला तर तुम्ही त्या बँकेची तक्रार थेट केंद्रीय बँकेत करु शकता.