कल्याणमध्ये हजार रुपयांवरून झालेल्या वादातून गॅरेज मेकॅनिकवर जीवघेणा हल्ला, CCTV फुटेज आले समोर

Attack on garage mechanic
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये हजार रुपयांच्या वादातून एका गॅरेज मेकॅनिकवर चाकूने जीवघेणा हल्ला (Attack on garage mechanic) करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी (Attack on garage mechanic) खडकपाडा पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर त्याचे दोन साथीदार अजूनही फरार आहेत. सागर माळवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे तर हसन खोत असे जखमी गॅरेज मेकॅनिकचे नाव आहे. त्याच्यावर मुंबई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात असलेल्या एका गॅरेजमध्ये हसन खोत हा तरुण मेकॅनिक म्हणून काम करतो. या गॅरेजच्या शेजारी गाड्यांचे वॉशिंग सेंटर आहे. काही दिवसांपूर्वी काम करत असलेल्या गॅरेजमधील एक गाडी घेवून हसन बाजूच्या या वॉशिंग सेंटरमध्ये गेला. हसनने गाडी धुण्यासाठी उभी केली मात्र याच वेळी सागर माळवे हा तिथे आला व त्याने तुमच्याकडे आधीचे एक हजार रुपये बाकी आहेत ते आधी दे असं हसनला सांगितलं. यावेळी हसनने माझा मालक पैसे देईल असे सांगितले.

हजार रुपयांवरुन झालेल्या वादाचे हल्ल्यात रुपांतर
यादरम्यान आरोपी आणि जखमी गॅरेज मेकॅनिक यांच्यामध्ये (Attack on garage mechanic) वाद झाला. याच वादातून संतापलेल्या सागर व त्याच्या दोन साथीदारांनी हसनला बेदम मारहाण केली. तर सागरने हसनवर चाकूने हल्ला (Attack on garage mechanic) केला. हसन या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सागर माळवे याला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु केला आहे.

हे पण वाचा :
रस्त्यावर उभ्या तरुणाचा GF ला हात लागताच संतप्त Angry BF ने अशा प्रकारे घेतला बदला

PM KISAN : 11व्या हप्त्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीत ???

वहागाव येथे अनैतिक संबंधातून एकाचा खून : दोन संशयित ताब्यात

जास्त व्याज मिळवण्यासाठी पालकांच्या नावाने सुरु करा FD !!!

IND vs ENG Test : चेतेश्वर पुजाराचे टीम इंडियात कमबॅक, ‘या’ खेळाडूचे स्थान धोक्यात