हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राणे विरुद्ध भास्कर जाधव (Rane Vs Bhaskar Jadhav) संघर्षाने आज कोकणात चांगलाच पेट घेतला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर खालच्या भाषेत टीका केली होती, त्यानंतर त्यांच्या या टीकेला आपण गुहागरमध्ये मध्ये येऊन उत्तर देऊ असं आव्हान निलेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार आज निलेश राणे (Nilesh Rane) चिपळूण मध्ये दाखल सुद्धा झाले. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यावर ठाकरे समर्थकांकडून दगडफेक (Nilesh Rane Attack News) करण्यात आली आहे. यानंतर ठाकरे आणि राणे समर्थक भिडल्याचे पाहायला मिळालं.
भाजप कार्यकर्त्यांकडून चिपळूणमध्ये निलेश राणे यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. पण याच दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही निलेश राणे यांच्या ताफ्यातील काही कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या काचादेखील फुटल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी पोलीसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या. संपूर्ण परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला
भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे निलेश राणे यांची आज सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली. तत्पूर्वी कोकणात राजकीय शिमगा पाहायला मिळाला. आधीच कोकणात राणे विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष टोकाला पोचला असून दोन्ही नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करत आहेत. त्यातच आता राणेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्यानंतर वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात हा कोकणात राणे विरुद्व भास्कर जाधव वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.