कराड | प्रवासात कराड जवळील एका ढाब्यावर जेवण करण्यास थांबलेल्या ग्राहकाने कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिल्याने थेट गळ्याला चाकू लावून वार केला आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील राजधानी ढाब्यावर हा प्रकार झाला असून सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोबत आणलेल्या कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिल्याने ग्राहकाने वेटरवर चाकू हल्ला केला. हायवेवरील राजधानी ढाब्यावर रात्री उशिरा हा प्रकार घडला. त्याप्रकरणी तळबीड पोलिसात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी रूपेश बावधनकर (रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संजय नाटेकर (वय- 32, रा. मार्केटयार्ड, कराड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, रात्री उशिरा वहागाव येथील राजधानी ढाब्यावर रूपेश बावधनकर जेवायला थांबले होते. त्यावेळी संजय नाटेकर त्यांच्याजवळ गेले. त्यांनी मालकाचे कत्र्याला जेवण देण्यास नकार दिला.
त्यावेळी बावधनकरने वेटरबरोबर वाद घातला. त्याला शिवीगाळ केली. रूपेशने हॉटेलमधील चाकू हातात घेऊन नाटेकरच्या गळ्याच्या बाजूला मारला. संजयच्या मानेवर जखम झाली आहे. मालक चेतन जाधव यांनी नाटेकरला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याबाबत नाटेकरने घटनेची फिर्याद पोलिसात दिली आहे.