सिंचन भवनासमोर तरुणाचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत एका तरुणाने सिंचन भवनासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे या परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या ठिकाणी उडवलेला गोंधळ थांबवला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचा राहुल वडमारे या तरुणाने आरोप केला. त्यानंतर सिंचन भावना समोर असलेल्या रस्त्यावरच हा तरुण अचानक घोषणाबाजी करत अंगावर रॉकेल ओतून धावत आला. यामुळे या परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

मात्र पोलिसांनी या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. या तरुणाला समजावून सांगत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment