सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्योती नलावडे या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसानी ताब्यात घेतले आहे.
जावली सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप या महिलेने आणि कुटुंबीयांनी केला आहे. बँकेच्या संचालकांवर कारवाई करून दोषारोप दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच प्रजासत्ताक दिनादिवशी आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.
झेंडावंदन सुरु असतानाच महिलेने स्वत:ला पेटवून घरण्याचा केला प्रयत्न pic.twitter.com/0IPBe1rRPE
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 26, 2022
प्रशासनाने आणि पोलिसांनी दखल न घेतल्याने महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या संचालक मंडळावर कारवाईची मागणी या महिलेने केली आहे..