अहमदनगर प्रतिनिधी | वारंवार शरीर सुखाची मागणी करून देखील दाद न देणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. पीडित मुलगी दलित कुटुंबातील असून तिच्यावर झालेल्या अन्यायाची तिने दाद मागितल्याने तिला तिच्या राहत्या घरातून आणि गावातून हाकलून दिले आहे. नगरजिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकारण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हयात या घटनेने खळबळ माजली आहे.
लखनकुमार काकडे, संचालक श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना आणि बाजार समिती श्रीगोंदा असे मुख्य आरोपीचे नाव असून लक्ष्मण नलगे , सुधीर नलगे, भाऊ नलगे, कुमार नलगे, शुभांगी नलगे, स्नेहल काकडे-भोसले सर्व राहणार सांगवी दुमाला अशी आरोपींची नावे आहेत. या संदर्भात पीडित मुलीने रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२०१४ सालापासून आरोपी लखन काकडे हा पीडित मुलीची सारखी छेडछाड करत होता आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता. मागील काही दिवसापूर्वी त्याने तिच्यावर बळजबरी करत शरीर संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर ती या घटनेची फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता तिला पोलीस ठाण्याच्या आवारातच तोंडात विष ओतून मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यामुलीला दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. तिची प्रकृती सुधारली असता तिने श्रीगोंद्यात येऊन आरोपीच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट