नवी दिल्ली । जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. आपले पॅन कार्ड 10 दिवसांनंतर काम करणे थांबवेल. तसेच करंट खात्यावरही वाईट परिणाम होईल. SBI ने आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क केले आहे. 30 जूनपूर्वी ग्राहकांनी आपला पॅन आणि आधार लिंक करावा असा इशारा बँकेने दिला आहे. अन्यथा, नंतर व्यवहारामध्ये समस्या उद्भवू शकतात, करंट खात्यावर देखील परिणाम होईल.
पॅनसह आधार लिंक करा (Aadhaar-PAN linking)
आधार आणि पॅन जोडणे बंधनकारक असल्याचे SBI ने आपल्या ग्राहकांना ट्विटमध्ये सांगितले आहे. जर पॅन आणि आधार जोडले गेले नाहीत तर पॅन निष्क्रिय तर होईलच तसेच ग्राहकांना व्यवहारातही अडचणी येतील. पॅनला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 30 जून आहे. SBI ने ट्वीट करून माहिती दिली की, आधार आणि पॅन जोडणे बंधनकारक आहे. जर 30 जूनपर्यंत पॅन आणि आधार जोडले गेले नाहीत तर पॅन निष्क्रिय होईल आणि ग्राहकांना व्यवहारात त्रास होईल. कृपया हे लक्षात घ्या की, यानंतर ग्राहक त्यांचे पैसे काढू शकणार नाहीत. तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभही मिळू शकणार नाही आणि अनुदानही मिळणार नाही. तसेच पॅनकार्ड आधारशी जोडलेला नसेल तर कलम 234 H अंतर्गत तुमच्याकडून 1000 रुपये अधिक दंड आकारला जाईल.
KYC करण्याची अंतिम मुदत 30 जून आहे
तसेच, बँकेने आपल्या ग्राहकांना आवाहन केले आहे की, ते घर बसल्या ही KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. SBI ने सांगितले की, ग्राहकांना KYC अपडेट करण्यासाठी शाखेत भेट देण्याची गरज नाही. KYC अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पोस्ट किंवा मेलद्वारे पाठविण्याची विनंती मान्य करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group