हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Loan : आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अचानक कधीही पैशांची गरज भासू शकते. अशा वेळी पैसे मिळवण्याचा एकमेव सोपा मार्ग म्हणजे पर्सनल लोन. इतर कर्जांपेक्षा पर्सनल लोनची प्रक्रिया जलद आणि सुलभ आहे. मात्र यावर जास्त व्याज द्यावे लागते. अनेक बँकांकडून यावर 13% पेक्षा जास्त वार्षिक व्याज आकारले जाते. मात्र काही बँका 9% पेक्षा कमी व्याजदराने देखील पर्सनल लोन देतात. चला तर मग आज आपण 5 लाखांच्या पर्सनल लोनवरील बँकांचे व्याजदर आणि 5 वर्षांसाठीचा त्याचा EMI काय असेल ते जाणून घेऊयात…
Personal Loan साठी धनलक्ष्मी बँकेकडून 12.40% व्याज दर आकारला जातो आणि त्याचा EMI 11224 रुपये आहे. साऊथ इंडियन बँकेमध्ये हा दर 12.50 टक्के आणि EMI 11,249 असेल तसेच कॅनरा बँकेत 13.15 टक्के व्याजदर आणि 11415 रुपये EMI असेल आणि कर्नाटक बँकेत 13.48 टक्के व्याजदरासहीत 11,500 रुपये EMI असेल.
सेंट्रल बँकेकडून Personal Loan साठी 11.75% दराने व्याज आकारले जाते. तसेच 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी 11059 रुपये EMI असेल. त्याच वेळी, इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 11.90 टक्के व्याजदरासह 11,097 रुपये EMI असेल, त्याच प्रमाणे करूर वैश्य बँकेमध्ये 11.95 टक्के व्याजदरासह 11,110 रुपये EMI, UCO बँकेमध्ये 11.95 टक्के व्याजदरासह 11,110 रुपये EMI तसेच Axis Bank चा EMI 11122 आहे ज्यावर 12 टक्के व्याज दर आकारला जाईल.
पंजाब आणि सिंध बँकेच्या Personal Loan वरील व्याज दर 10.55% आणि EMI 10759 रुपये असेल. तसेच एसबीआयमध्ये हा दर 10.65% आणि EMI 10,784 रुपये आहे, IDBI बँकेत 11% व्याजदरासह 10871 रुपये EMI, HDFC बँकेमध्ये 11% व्याजदरासह 10871 रुपये EMI आणि युनियन बँकेमध्ये 11.20% व्याजदराने 10921 रुपये EMI असेल.
बँक ऑफ महाराष्ट्र कडून Personal Loan वर सर्वात कमी 8.90% व्याजदर आकारला जातो. त्यानुसार, 5 लाख रुपयांच्या पर्सनल लोनवरील EMI 10,355 रुपये होईल. त्याच वेळी, बँक ऑफ इंडियाचा व्याज दर 9.75% आणि EMI 10562 रुपये, पंजाब नॅशनल बँकेत 9.80% आणि EMI 10,574 रुपये आहे, बँक ऑफ बडोदामध्ये 10.25% आणि EMI 10,685 रुपये आहे आणि कोटक बँक 10.25% आहे आणि 10,685 रुपये EMI असेल.
इंडियन बँक Personal Loan वरील व्याज दर 10.30% आहे आणि EMI 10,697 रुपये आहे. त्याचप्रमाणे फेडरल बँक 10.49 टक्के आणि EMI 10,744 रुपये, IDFC बँक 10.49 टक्के आणि EMI रुपये 10,744, IndusInd बँक 10.49 टक्के आणि EMI 10,744 रुपये आणि ICICI बँक 10.50 टक्के आणि EMI रुपये 10744 असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/personal-loan.html
हे पण वाचा :
Business Idea : हिवाळ्यात अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
DCB Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 8.25% पर्यंत व्याज
Stock Market : बुल अन् बेअर मार्केट म्हणजे काय ??? यादरम्यान गुंतवणूकदारांनी काय करावे ते जाणून घ्या
Gold Loan : गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन सुविधा म्हणजे काय ??? त्याचे फायदे अन् जोखीम समजून घ्या
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ, जाणून घ्या संपूर्ण आठवड्यातील सराफा बाजाराची स्थिती