सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खटाव तालुक्यातील चोराडे गावी चोराडे ते म्हासुर्णे मार्गावरील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडून अज्ञात चोरटयांनी पैशाची बॅग लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर तब्बल एक महिन्यात औंध पोलिसांनी 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबात अधिक माहिती अशी की, चोराडे, ता. खटाव गावी चोराडे ते म्हासुर्णे रोडवरील कुमार पेट्रोलीयम सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस या पेट्रोलपंपावरील काम करणारे कर्मचारी संजय गंगाराम अडागळे, (वय 29) हे दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11:20 वाजण्याच्या सुमारास कलेक्शन झालेले 98 हजार 470 रुपये एका बॅगेतून घेवून निमसोड येथे जात होते. यावेळी ते एका अनोळखी मोटार सायकल स्वाराच्या मोटारसायकलवरुन जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरटयांनी त्यांचे तोंड दाबून धरले व मारहाण, दमदाटी करुन कॅशची बॅग घेवून मोटारसायकलवरुन पळून गेले. याबाबात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असता.
औंध पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्य्यक पोलीस निरीक्षक दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्याबाबत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणा आधारे 3 आरोपी निष्पन्न केले. आरोपींची ओळख पटल्यानंतर 3 आरोपीपैकी 2 आरोपीस कराड येथून ताब्यात घेवून अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी 33 हजार रुपये ताब्यात घेतली. तसेच आणखी 1 आरोपीचा शोध घेवून सदर आरोपीस अटक करुन जप्त करण्यात आला आहे.
संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औंध पोलीस स्टेशनचे सहाय्य्यक पोलीस निरीक्षक डी. पी. दराडे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सहाय्य्यक पोलीस फौजदार बी. एन. जाधव, पोलीस हवालदार पी. पी. पाटील, पोवीस हवालदार आर. एस. वाघ, पोलीस नाईक एस.एच.पाडळे, पोलीस नाईक आर. एस. सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल के. एल. जाधव, के.एन. हिरवे यांनी संबंधित गुन्हा उघडकीस आणला.