औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३० शाळा बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांनी दिली आहे. राज्यभरातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ९१७ शाळा बंद करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय शासनाने घेतला आहे.
यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा शासन निर्णयामुळे बंद होणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यावरून बराच शासन दरबारी आधारही झाला.
त्यानंतर दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा रद्द करण्यात आल्या. यावर आमदारांची उपसमिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही. सध्या दहावीच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येत आहेत. आता त्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे देखील समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहेत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.