औरंगाबादमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये काल दुचाकींचा विचीत्र अपघात (accident) झाल्यामुळे दोन तरुणांचा ट्रॅक्टरखाली येऊन जागीच मृत्यू (accident) झाला होता. हि घटना ताजी असताना आज अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव ट्रकने तीन कामगारांना चिरडले आहे. या भीषण अपघातात (accident) मृत पावलेल्यांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश आहे. या अपघातानंतर रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला होता. दीपक लोखंडे, अनिता लोखंडे आणि निकीता लोखंडे अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

काय घडले नेमके?
औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसी परिसरात हा भीषण अपघात (accident) झाला. सकाळी साडे आठ-नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.एमएच 04 एफजे 5288 क्रमांकाच्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती.

अपघातानंतर या मार्गावरील बघ्यांची गर्दी जमली होती. या अपघातात (accident) मृ्त्यू झालेल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!